तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी पुणे पोलिसांच्या हाती Sanjay Rathod यांच्याविरोधात मोठा पुरावा? ABP Majha

आता बातमी तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी वनमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागलेल्या संजय राठोडांसंदर्भातली... या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पुणे पोलिसांना, तरुणीच्या आत्महत्येपूर्वीच्या तीन-चार दिवसांपूर्वींचं फोन कॉल रेकॉर्डिंग सापडल्याची माहिती मिळतेय.. इंडियन एक्स्प्रेसनं हे वृत्त प्रसिद्ध केलंय. आत्महत्येपूर्वी तरुणीनं ज्या व्यक्तीशी संभाषण केलं ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून संजय राठोड असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. पुणे पोलिसानी आत्महत्या करणाऱ्या तरुणीचा मोबाईल फोन तपासासाठी फॉरेन्सिक लॅबकडे पाठवला होता... दरम्यान ७ फेब्रुवारीला पुण्यात राहणाऱ्या एका तरुणीनं राहत्या इमारतीमधून उडी मारुन आत्महत्या केली. विरोधकांनी या प्रकरणी तात्कालीन वनमंत्री संजय राठोडांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं होतं.. त्यानंतर संजय राठोडांना वनमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola