Pune PMPML Bus : पीएमपीएमएलच्या बसमध्ये आता गुगल पे आणि फोन पेची सुविधा
पीएमपीएमएलच्या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची कॅशची चिंता आता मिटणारेय. कारण, पीएमपीएमएलच्या बसमध्ये आता गुगल पे आणि फोन पेची सुविधा मिळणारेय. त्यामुळे, ऑनलाईन पेमेंट करत प्रवासी तिकीट काढू शकणार आहेत. सुट्ट्या पैशांचा घोळ मिटवण्यासाठी पीएमपीएमएलने हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय.