Pune : साध्वी सावित्रीबाई फुले असा उल्लेख का केला? समता दलाच्या कार्यकर्त्यांचा आक्षेप ABP Majha

Continues below advertisement

पुणे महापालिकेच्या एका उद्यानाला 1991 पासून सावित्रीबाई फुलेंचे नाव देण्यात आलय.  पण या उद्यानाच्या फलकावर सावित्रीबाईंचा उल्लेख साध्वी सावित्रीबाई फुले असा करण्यात आलाय. सावित्रीबाईंचा उल्लेख साध्वी असा करण्याला आत्ता तीस वर्षानंतर आक्षेप घेण्यात आलाय. हा पुणे महापालिकेकडून सावित्रीबाई फुलेंचे दैवतीकरण करण्याचा आणि त्यांना हिंदुत्ववादी विशेषणं लावण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप करण्यात आलाय.  समता दलाच्या कार्यकर्त्यांनी सावित्रीबाईंच्या नावाच्या आधी असलेला साध्वी हा उल्लेख झाकून टाकलाय.  पुण्यातील ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाजवळ हे उद्यान आहे. 1991 ला कॉंग्रेस सरकारमधील तत्कालीन सार्वजनिक  बांधकाम मंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते या उद्यानाची कोनशीला बसवल्याची पाटी देखील आहे.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram