Dehu : PM Modi यांच्या हस्ते शिळा मंदिराचं लोकार्पण, मोदींच्या दौऱ्यामुळे देहुला छावणीचं स्वरुप
देहूतील संत तुकाराम महाराज शिळा मंदिराच्या लोकार्पण कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देहूत येणार असून त्यांच्या स्वागताची देहूत जय्यत तयारी सुरु आहे. आज दुपारी १ वाजून १० मिनिटांनी पंतप्रधान मोदींचं देहूत आगमन होणार आहे. सुरुवातीला पंतप्रधान देहूतील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहेत. त्यानंतर दुपारी दोन वाजता वारकऱ्यांना संबोधित करणार आहेत. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे अन्य नेतेही उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमानंतर पंतप्रधान मुंबईतील कार्यक्रमांसाठी रवाना होणार आहेत.