PM Narendra Modi | पंतप्रधान मोदी पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटला भेट देण्याची शक्यता
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Nov 2020 11:15 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 नोव्हेंबरला पुण्यात येऊन सिरम इन्स्टिट्यूटला भेट देण्याची शक्यता आहे. पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटकडून कोरोनावरती वॅक्सीन तयार केलं जातंय. त्या वॅक्सीन निर्मितीची प्रक्रिया कुठपर्यंत आलीय हे पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 नोव्हेंबरला पुण्यात येण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने प्रशासनाच्या हालचाली सुरू झाल्या असुन विभागीय आयुक्त कार्यालयात त्यासाठी काल एक बैठकही आयोजित करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत या दौर्यात इतर काही देशांचे राजदूतही सहभागी होण्याची शक्यता आहे.