Plane Crash in Indapur : इंदापूरमध्ये शेतात कोसळलं विमान, इंधन संपल्यानं अपघात झाल्याची शक्यता

इंदापूर तालुक्यातील कडबनवाडी गावातील शेतात येथे कारवार एव्हीएशनचे विमान कोसळले. या अपघातात पायलट भावना राठोड किरकोळ जखमी झाली आहे. बारामतीतील कार्व्हर एव्हीएशन मार्फत प्रशिक्षण दिले जाते. सकाळी विमानाने बारामतीतून उड्डाण केल्यानंतर विमान खाली कोसळले.. हे विमान विमानातील इंधन संपल्यामुळे कोसळले आहे. यामध्ये महिला पायलट किरकोळ जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर इंदापूर तालुक्यातील शेळगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.., सध्या घटनास्थळी कारवार एव्हिएशन बारामती यांचे स्टाफ हजर असून पोलिसांनी योग्य बंदोबस्त घटना ठिकाणी ठेवला आहे. हे विमान दादाराम आबाजी बाराते यांच्या शेतात कोसळले..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola