Mahaportal | पुण्यात सलग दुसऱ्या दिवसी महापोर्टलचा फज्जा, वीज गेल्याने परीक्षा रद्द | ABP Majha
महापोर्टलकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षेचा पुण्यात सलग दुसऱ्या दिवशीही फज्जा उडाला. कालप्रमाणेच आजही वीज गेल्याने परीक्षेचा खेळखंडोबा झाला. आज ही दहा वाजताची बॅच सुरु झाली, तेव्हा वीज गेली. गोंधळ सुरु होऊ नये, म्हणून परीक्षार्थींना वेळ वाढवून देऊ, असं सांगण्यात आलं. मात्र नंतर महापोर्टलची टीम या सर्वांना परीक्षा हॉलमध्ये वाऱ्यावर सोडून निघून गेली. त्यानंतर महापोर्टलकडून आजची परीक्षा रद्द करण्यात आल्याची नोटीस लावण्यात आली.