Pimpri Accident | बघ्यांचा आततायीपणा जीवावर, अग्निशमन दलाच्या जवानासह एका कामगाराचा मृत्यू | ABP Majha
पिंपरी चिंचवड परिसरातील दापोडीत अमृत योजनेच्या कामादरम्यान मोठा अपघात झाला. योजनेच्या कामावेळी खड्ड्यात अडकलेल्या कामगाराला वाचवण्यासाठी गेलेल्या अग्निशमन दलाच्या जवानाचा आणि एका कामगाराचा मृत्यू झाला. 15 फूट खोल खड्ड्यात काम करणारा नागेश जमादार आणि अग्निशमनचे विशाल जाधव या दोघांना बघ्यांच्या आततायीपणामुळे जीव गमवावा लागला. शिवाय अन्य चार जण जखमी झाल्याची माहिती मिळतेय. एक कामगार अजूनही खड्ड्यात अडकलेल्या अवस्थेत आहे. त्याला बाहेर काढण्याचं काम सुरु आहे.