Pimpri Chinchwad vehicle fire | पिंपरीत दहा दुचाकी पेटवल्या, आसपासच्या वाहनांचंही नुकसान

पुणे : पिंपरी चिंचवडमध्ये वाहनं तोडफोडीनंतर आता वाहनं पेटवण्याची घटना समोर आलेली आहे. पिंपरीमध्ये तब्बल 10 दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. दुचाकींना लावण्यात आलेल्या आगीमुळे काही काळातच आग मोठ्या प्रमाणात पसरली. त्यामुळे आजूबाजूच्या वाहनांचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. पैशाच्या वादातून ही वाहनं पेटवण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

वाहनं जाळण्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. पैशाच्या देवण-घेवाणीवरुन वाद झाला होता. त्याचाच बदला घेण्यासाठी एका मित्राने दुसऱ्या मित्राची गाडी पेटवली. मात्र आगीनं रौद्र रुप धारण केल्यामुळं आजूबाजूच्या वाहनांचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. यामध्ये एकूण 10 गाड्यांचं नुकसान झालं. काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवडमधील एका पोलिसांच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वाहनं तोडफोडीच्या घटनांबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर काहीच दिवसांत पुन्हा एकदा हा प्रकार समोर आला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola