Math Tricks Pimpri Chinchwad: गाण्याच्या तालावर सोडवा गणितं

गणित विषय अवघड वाटणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिलासा देणारी बातमी...
पिंपरी चिंचवडमधील शिक्षक अभिजित भांडारकर यांनी गाण्यांमधून गणित विषय शिकवण्यास सुरुवात केलीये.. भांडारकर सरांनी तब्बल १ हजार ८० गणिती सूत्र संगिताच्या तालावर बसवली आहेत... गणित आणि गीत यांची सांगड घालण्यात त्यांना यश आलंय.. विद्यार्थीही आनंदाने त्यांच्याकडून धडे घेत आहेत.. शालेय जीवनात भांडारकर सरांचीहा गणित विषय कच्चा होता.. इतर विद्यार्थ्यांवर अशी वेळ येऊ नये याचा विडा उचलत त्यांनी गणिताला सोप्या पद्धतीनं शिकविण्याचा विडा त्यांनी हाती घेतला.. त्यातून संगीताच्या तालावर धडा देण्याची संकल्पना समोर आली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola