Pimpri Chinchwad | पालकांना सावध करणारी बातमी! घरात झोपाळा खेळणं मुलीच्या जीवावर बेतलं!
Continues below advertisement
आठ वर्षीय सुमैय्या शेख आणि तिच्या तीन बहिणी याच घरात खेळत होत्या. तेव्हा तिचे आई-वडील खरेदीसाठी बाहेर गेले होते. सुमैय्या एका खोलीत होती आणि इतर तीन बहिणी त्यांच्या त्यांच्या कामात व्यस्त होत्या. त्यावेळी सुमैय्याने खिडकीच्या पडद्यासाठी लावलेल्या लोखंडी रॉड ला स्कार्फ बांधून, झोपाळा केला. तोच झोपाळा खेळत असताना, झोपळ्याचा स्कार्फ तिच्या गळ्याला वेढला गेला. तिला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. तिन्ही बहिणी मदतीसाठी धावल्या. परंतु तोपर्यंत उशीर झाला होता.
Continues below advertisement