ABP Majha Impact : पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांचा 'तो' अजब आदेश मागे
Continues below advertisement
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिलेला 'तो' अजब आदेश अखेर मागे घेतला आहे. आता सुधारित आदेश काढून खाजगी रुग्णालयांनी ऑक्सिजनची बचत करण्यासाठी नियमावली दिली आहे. हा नवा आदेश पिंपरी चिंचवड खाजगी रुग्णालय संघटनेलाही मान्य आहे. खाजगी रुग्णालयात ऑक्सिजनचा साठा उपलब्ध असेल तरच रुग्ण दाखल करून घ्यावे, असा अजब आदेश रुग्णांच्या जीवावर कसा उठणारा आहे, हे काल एबीपी माझाने समोर आणले होते. त्यानंतर पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांनी आपला आदेश मागे घेतला आहे.
Continues below advertisement