Pimpri Chinchwad : 5 जणांचा जीव घेणारं 'ते' होर्डिंग बेकायदा ABP Majha

पिंपरीच्या रावेत भागात काल होर्डिंग कोसळून ५ जणांचा मृत्यू झाला... या होर्डींगलगत एक पंक्चरचं दुकान आहे आणि सोसाट्याचा वारा तसेच पाऊस आल्यामुळे काही लोकांनी या दुकानाचा आडोसा घेतला होता... पण सोसाट्याच्या वाऱ्यामुले हे होर्डिंग कोसळलं आणि पाच जणांचा मृत्यू झाला तर तिघे जखमी झाले...  दरम्यान हे होर्डिंग  बेकायदा असल्याचं आता समोर आलंय... या होर्डिंगचे मालक आहेत महेंद्र गाडे, तर जागेचे मालक आहेत नामदेव बारकू म्हसुडगे... या प्रकरणी चौघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय...  या होर्डिंगवर कारवाई करण्याचा प्रयत्न याआधीच झाला होता.... पण जाहिरात असोसिएशन कोेर्टात गेली आणि कोर्टानं कारवाईवर स्थगिती दिली..

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola