Pimpri Chinchwad Accident : हिंजवडी पोलिसांचा ‘कार’नामा, अपघातानंतर गुन्हाच दाखल नाही
Continues below advertisement
बातमी पिंपरी चिंचवडमधून..
पोर्शे अपघाताची पुनरावृत्ती पुण्यातील हिंजवडी भागात घडली. २३ मे रोजी एका भरधाव कारनं
आकांक्षा परदेशी या तरुणीला उडवलं होतं. मात्र महिलेला किरकोळ इजा झाली असा दावा करत पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता. काल रात्री एबीपी माझानं ही बातमी दाखवताच हिंजवडी पोलिसांना जाग आली, आणि गुन्हा दाखल करण्यासाठी आज सकाळपासून धावाधाव सुरू झाली. मात्र पहिल्या दिवशी म्हणजे 23 मे ला गुन्हा दाखल का केला नाही असा सवाल उपस्थित होतो. एकीकडे आम्ही रस्ते सुरक्षेबाबत खूप गंभीर आहोत असं दावे करायचे, आणि दुसरीकडे भीषण अपघात झाल्यावरही २० दिवस गुन्हाच दाखल करायचा नाही, हा कुठला दुटप्पीपणा, असा सवाल पिंपरी चिंचवडचे रहिवासी करतायेत.
----------
पिंपरी चिंचवड पोलीस दलाचे उपायुक्त बापू बांगर यांनी काय प्रतिक्रिया दिलीये पाहूयात..
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement