Coronavirus | पुण्यातील चाकणमध्ये अंडी विक्रेते होम क्वॉरन्टाईन, 181 जणांच्या हातावर शिक्के
पिंपरी चिंचवड लगतच्या चाकणमधील अंडी विक्रेत्यांना होम क्वॉरन्टाईन करण्यात आलं आहे. 81 दुकानांमधील 181 जणांच्या हातावर तसे शिक्केही मारण्यात आले आहेत. एका अंडी विक्रेत्याला कोरोनाची लागण झालेली आहे, ती व्यक्ती या दुकानदारांना अंडी सप्लाय करत होती. म्हणून जिल्हा प्रशासन आणि खेड तालुका प्रशासनाने होम क्वॉरन्टाईनची प्रक्रिया सुरु केली आहे.