Pimpri Chinchwad मधील स्थायी समितीच्या 15 सदस्यांना ACB ची नोटीस, चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश
गेल्या महिन्यात पिंपरी चिंचवड महापालिकेत एसीबीने धाड टाकली होती. स्थायी समितीची बैठक संपताना एसीबीने धाड टाकल्याने एकच खळबळ उडाली. स्थायी समितीची बैठक असल्याने अनेक ठेकेदारही उपस्थित होते. आता Pimpri Chinchwad मधील स्थायी समितीच्या 15 सदस्यांना ACB ची नोटीस बजावली असुन चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.