चोरांना पाहून पळ काढणाऱ्या दोन पोलिसांचं निलंबन, सीसीटीव्हीत पोलिसांची निष्क्रियता कैद
मुद्देमाल घेऊन समोरून चोरटे जात असतानाही त्यांना अटकाव न करता स्वतः पळून जाणाऱ्या पुणे पोलीस दलातील त्या दोन पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. औंध येथील सोसायटीत 28 जानेवारी च्या पहाटे घडलेला प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला होता. या घटनेचा सीसीटीव्ही सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पुणे पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाल्याचा ठपका ठेवत या दोघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.