Gaja Marne | गुंड गजा मारणेसह साथीदारांवर खंडणीचा गुन्हा दाखल होणार : पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश

Continues below advertisement
कुख्यात गुंड गजा मारणेच्या अडचणीत वाढ. पिंपरी चिंचवड पोलीस त्याच्यासह साथीदारांवर खंडणीचा ही गुन्हा दाखल करणार आहे. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी तशी माहिती दिलीये. तळोजा कारागृहातून बाहेर पडल्यानंतर गजा मारणे पुण्यातील घरी येत होता. त्यावेळी चारचाकी वाहनांची मोठी रॅली काढल्याने त्याच्यावर पिंपरी चिंचवड आणि पुणे पोलिसांनी गुन्हे दाखल केलेत. त्यात गजा मारणेला साथीदारांसह अटक ही झाली होती. पण त्याचवेळी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील उर्से टोल नाक्यावर रॅलीतील एका ही वाहनाने टोल भरला नसल्याचं आता समोर आलंय. दादागिरी करून, इतर वाहनं बाजूला उभी करून वाहतूक कोंडी केली आणि त्यांची वाहनं टोल वरून मोफत पुढे काढल्याचं सीसीटीव्हीतून स्पष्ट झालंय. त्यामुळे याप्रकरणी खंडणीचा गुन्हा नव्याने दाखल करण्यात येतोय. त्यामुळे गजा मारणेच्या अडचणीत आणखीच वाढ झालेली आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी आत्तापर्यंत गजा मारणेच्या 31 साथीदारांना बेड्या ठोकल्या आहेत तर 13 अलिशान वाहनं ही जप्त केलीत. यात शिवसेनेचा लोगो असलेली आणि त्यावर उपतालुका प्रमुख खडकवासला असं नमूद आहे. पोलिसांकडून गजाच्या साथीदारांची धरपकड सुरू असली तरी स्वतः गजा मारणे मात्र त्यांच्या हाती अद्याप ही लागलेला नाही.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram