BJP MLA Laxman Jagtap Passes Away : Pimpari तील भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचं निधन

पिंपरी-चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांचं दीर्घ आजारामुळे निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या 59 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. जगताप हे कर्करोगाची झुंज देत होते आज अखेर त्यांची झुंज अपयशी ठरली. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर पुण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. लक्ष्मण जगताप हे तीन टर्म पिंपरी-चिंचवडचे आमदार राहिले आहे. लक्ष्मण जगताप यांचे पार्थिव अंत्यदर्शन घेण्यासाठी दुपारी 3 ते 6 या वेळेत त्यांच्या घरी ठेवण्यात येणार आहे. संध्याकाळी 7 वाजता त्यांच्यावर पिंपळे गुरव येथे अंत्यविधी होईल. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola