PFI विरोधात पुन्हा छापासत्र, एनआयए, एटीएससह तपासयंत्रणांनी पीएफआयवर पुन्हा एकदा मोठी कारवाई : ABP Majha

Continues below advertisement

राज्यातल्या सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टात होणाऱ्या सुनावणीकडे राज्याचं लक्ष लागलंय.  पण त्याचवेळी देशात आज एनआयए, एटीएससह तपासयंत्रणांनी पीएफआयवर पुन्हा एकदा मोठी कारवाई केलीय. एनआयएनं देशभरात २४७ जणांना ताब्यात घेतलंय. तर महाराष्ट्रात ४३ जणांना ताब्यात घेतलंय. त्यापैकी काहींना अटकही केलीय. महाराष्ट्रात आज पुन्हा मोठी कारवाई करताना ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, परभणी, जालना अशा अनेक ठिकाणी एकाचवेळी छापे टाकण्यात आले. पीएफआयच्या काही कार्यकर्त्यांना अटक करण्यात आलीय. तर काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलंय.   

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram