Pune NCP Program : पुण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यक्रमातील गर्दीवरून आयोजक प्रशांत जगताप यांची माफी
पुणे : आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी कार्यक्रमाला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोरोना नियमाला हरताळ फासल्याचे दिसून आले. त्यानंतर कार्यक्रम संपल्यानंतर अजित पवारांना येथील गर्दी विषयी विचारले असता त्यांनी सांगितले की, कार्यक्रमाच्या आयोजकांवर कडक कारवाई करण्यासाठी मी पोलिसांना सांगणार आहे.