Pune Kidney Transplantation: रुबी हॉल प्रकरणानंतर अवयव प्रत्यारोपणाला ब्रेक ABP Majha
पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमधील किडनी तस्करी प्रकरणानंतर अवयव प्रत्यारोपणाला ब्रेक लागतोय की काय अशी परिस्थिती निर्माण व्हायला लागलेय... कारण प्रत्यारोपणासाठी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचलानालयाकडे ५ एप्रिलनंतर एकही प्रकरण नोंद नाहीये.... पुण्यातील किडनी तस्करी प्रकरणानंतर डॉक्टरांमध्ये कारवाईची भीती आहे... त्यामुळे प्रत्यारोपणाच्या केसेस घेण्यास राज्यातील रुग्णालयांकडून टाळाटाळ केली जात असल्याचं दिसून आलंय. किडनी, ह्रदय, आतडे, फुप्फुस प्रत्यारोपण शस्त्रक्रियांना या प्रकरणाचा फटका बसलाय