PM Modi Visit Pune : विरोधक मोदींना पुण्यात दाखवणार काळे झेंडे,पवारही पुरस्कार सोहळ्यात लावणार हजेरी
पंतप्रधान नरेंद्र मोदींना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यास काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, ठाकरे गट तसेच काही संघटनांचा विरोध आहे. गो बॅक मोदी म्हणत विरोधी पक्ष पुण्यात पंतप्रधानांच्या दौऱ्याला विरोध करणार आहेत. ज्या मंडई परिसरात आंदोलन केलं जाणार आहे, त्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलाय. दरम्यान, शरद पवार कार्यक्रमात तर कार्यकर्ते मोदींच्या विरोधात आंदोलनात असतील. पवारांनी या कार्यक्रमात सहभागी होऊ नये, अशी विनंती काल मविआचे पुण्यातील नेते करणार होते.