Nitin Gadkari on Pune Air Bus : पुण्यात लवकरच हवेतून चालणाऱ्या बसेस आणण्याचा विचार
Nitin Gadkari on Pune Air Bus : पुण्यात लवकरच हवेतून चालणाऱ्या बसेस आणण्याचा विचार
पुणे : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी यांनी पुण्यातील प्रदूषण कमी करण्यासाठी तसेच कचरामुक्त पुणे करण्यासाठी उपाय सुचवले आहेत. पुण्यात प्रदूषण वाढले आहे. त्यामुळे पुणे अजून वाढवू नका,पुण्याला मोकळा श्वास घेऊ द्या, असे आवाहन नितीन गडकरी यांनी केले आहे. पुण्याला जुणे दिवस आणा, पुण्याला प्रदूषणापासून मुक्त करा, अशी विनंती देखील नितिन गडकरी यांनी अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांनी या वेळी केली आहे.
नितीन गडकरी म्हणाले, पुणे आता अधिक वाढवू नका. पुणे प्रदूषित करु नका. मी लहान असताना माझ्या बहिणीकडे स्वारगेटला रहायला यायचो तेव्हा पर्वतीवरुन गार हवा येत होती. परंतु आता ही हवा हरवली आहे. पुणे सर्वाधिक प्रदूषित शहर झाले आहे. यामुळे आता पुणे अधिक वाढवू नका. पुणे प्रदूषीत करु नका.