Kasba Bypoll Election : कसबा पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट, भाजप काँग्रेसविरोधात आयोगात
Continues below advertisement
कसब्याच्या पोटनिवडणुकीत आता नवा ट्विस्ट आलाय... महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांची उमेदवारी रद्द करण्याची मागमी भाजपने निवडणूक आयोगाकडे केलीय. धंगेकर यांनी उपोषण करून आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप भाजपने केलाय. दरम्यान, प्रचाराची मुदत संपल्यानंतर भाजपने पोलिसांना सोबत घेऊन पैसे वाटल्याचा आरोप धंगेकरांनी केला होता... तसा व्हिडीओही व्हायरल झालाय. आणि त्याच्या निषेधार्थ त्यांनी कसबा गणपती मंदिरासमोर उपोषण केलं होतं... दरम्यान, पोलिसांनी कारवाईचं आश्वासन दिल्यानंतर धंगेकरांनी उपोषण मागे घेतलंय... मात्र या सगळ्या घडामोडींमुळे या पोटनिवडणुकीचा प्रवास, आधी भाषणांमधून नेत्यांच्या बाता, त्यानंतर कार्यकर्त्यांच्या एकमेकांना लाथा आणि आता रुपयांच्या नोटा, अशा मार्गाने होत असल्याची चर्चा कसबा आणि चिंचवडमध्ये रंगलीय.
Continues below advertisement
Tags :
Money Allegations Video Viral BJP 'Mahavikas Aghadi Election Commission By-election Candidate Ravindra Dhangekar Cancellation Of Candidature Breach Of Code Of Conduct Campaign Deadline Kasabya New Twist