कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे पिंपरी-चिंचवडसाठी नवे नियम, काय आहेत निर्बंध?

पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाच्या अनुषंगाने नवीन नियमावली

  1. होम आयसोलेशनमध्ये म्हणजे गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांनी होम असोलेशन नियमांचा भंग करुन ते घराबाहेर फिरू नये. अन्यथा त्यांच्यावर कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात येईल.

  2. ज्या सोसायटीत रुग्ण होम आयसोलेट आहे, त्या सोसायटीच्या चेअरमनला त्या बाधीत रुग्णांवर लक्ष ठेवावे लागणार आहे. यात हलगर्जीपणा झाल्यास संपुर्ण सोसायटी सिल केली जाणार आहे.

  3. दुकानांमध्ये सोशल डिस्टनसिंगचा फज्जा उडाला तसेच इतर कोरोना नियमांचे उल्लंघन झाले, तर संबंधित दुकान मालकांवर फौजदारी गुन्हा दाखल करून ते दुकान तात्काळ सील ही केले जाईल.

  4. भाजी मार्केटमध्ये समविषम पध्दतीने मार्केट चालु ठेवावे. त्या ठिकाणी गर्दी होणार नाही आणि कोरोना नियमांचे पालन होईल याची मार्केट असोशिएशनने दक्षता घ्यावी. अन्यथा पोलिसांमार्फत दंडात्मक कारवाई करण्यात येईल. शिवाय संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येईल.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola