Pune NCP Protest: लाल महालात लावणीप्रकरणी पुण्यात राष्ट्रवादीचं आंदोलन ABP Majha
पुण्यातील लाल महालात लावणीचं शुटिंग झाल्याचं समोर आल्यानंतर मराठा महासंघ,संभाजी ब्रिगेड आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली. या लावणी शुटिंगचा संभाजी ब्रिगेडने निषेध केला. आज मराठा महासंघाकडून लाल महालात शुद्धिकरण करण्यात आलं. माँ जिजाऊंच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालून आणि लावणी शुटिंग झालेल्या ठिकाणी शुद्धिकरण करण्यात आलं. तिकडे राष्ट्रवादी काँग्रेसनंही लाल महालासमोर आंदोलन करुन या सगळ्या प्रकाराचा निषेध केला