Navle Bridge : नवले पूल परिसरात सतत अपघात का होतात? नॅशनल हायवे अथॉरिटीच्या निदर्शनास काय आलं?
पुण्यातील नवले पुल अपघातप्रकरणी नवी माहिती समोर आलीये. कंटेनरचे ब्रेक फेल झाले नसल्याचं तपासात उघड झालंय.. मात्र अपघात नेमका कशामुळे झाला हे अस्पष्ट आहे... काल रात्री पुण्यातील नवले पुलावर मोठा अपघात झाला, कंटेनरने धडक दिल्याने 24 गाड्या एकमेकांवर आदळल्या.. या अपघातात 13 जण जखमी झालेत तर वाहनांचंही मोठं नुकसान झालंय.. या अपघाताप्रकरणी मुख्यमंत्री शिंदेंनी चौकशीचे आदेश दिलेत...दरम्यान नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी महामार्गाची पाहणी केलीये.