Narendra Modi Lokmanya Tilak Award : नरेंद्र मोदींना टिळक पुरस्कार, काँग्रेसचा विरोध

Lomanya Tilak Award : टिळक स्मारक  (narendra modi)  ट्रस्टकडून देण्यात येणारा लोकमान्य राष्ट्रीय पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने या निर्णयाला विरोध केला आहे. पुणे शहरातील काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे आणि नेत्यांनी थेट काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना पत्र पाठवून विरोध केला आहे. राहुल गांधी हे नरेंद्र मोदी यांच्या लोकशाही विरोधी विचारांना विरोध करत आहेत. देशात आणि परदेशामध्ये सुद्धा नरेंद्र मोदी हे लोकशाही विरूध्द कृत्य करत असताना आपल्या काँग्रेसच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांनी त्यांना लोकमान्य टिळकांच्या विचारांशी विसंगत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा विचार करावा, असं अरविंद शिंदे यांनी पत्रात म्हटलं आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola