Bhaskar Jadhav Case Filed : नारायण राणे यांच्यावर टीका, भास्कर जाधव यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल
ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्याविरोधात पुण्यातही गुन्हा दाखल झालाय. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात अवमानकारक भाषा वापरून सामाजिक भावना दुखावल्याचा आरोप जाधव यांच्यावर करण्यात आलाय. पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात जाधवांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कुडाळमध्ये भाषण करताना जाधव यांनी राणेंवर टीका केली होती. त्यानंतर कुडाळ आणि अन्य ठिकाणीही राणेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.