Nana Patole on Pune Accident : अपघातावेळी आमदाराचा मुलगाही उपस्थित, पटोलेंचा मोठा आरोप, रोख कुणावर?

Continues below advertisement

Nana Patole on Pune Porsche Accident News Updates: पुणे : पुणे अपघात (Pune Accident) ज्यावेळी घडला त्यावेळी पबमधून दोन गाड्या निघाल्या, त्यांच्यात रेस लागली. त्यातली एक गाडी पुढे गेली आणि जी गाडी मागे राहिली त्या गाडीनं दोघांना चिरडलं, असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. त्यासोबतच धनिकपुत्राच्या पोर्शे गाडीसोबत (Porsche Accident) जी दुसरी गाडी होती, त्यात एका आमदाराचा मुलगा होता, असा खळबळजनक दावाही नाना पटोले यांनी केला आहे. तसेच, या घटनेतील डॉ. तावरेंनी सर्वांची नावं समोर आणणार असल्याचं म्हटलं होतं, त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, त्यांना सुरक्षा पुरवावी आणि या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणीदेखील नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे. 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बोलताना म्हणाले की, "पबमधून निघाले, त्यामध्ये दोन गाड्या होत्या. त्या गाड्यांमध्ये रेस लागली होती. एक गाडी पुढे गेली आणि जी गाडी मागे राहीली त्या गाडीने दोघांना चिरडलं, जी गाडी पुढे गेली त्यात एका आमदाराचा मुलगा होता. कोण आमदार? हे मुख्यमंत्री यांनी सांगीतल पाहिजे. मुख्यमंत्री सुट्टी घेऊन गेले, दोन उपमुख्यमंत्री हे जनतेच्या आरोपीच्या पिंजऱ्यांत आहेत." पुढे बोलताना तावरेंच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो, असं नाना पटोले म्हणाले. तावरे यांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. सरकारनं याची काळजी घेतली पाहिजे. कोण पोलीस आणि डॉक्टर यांच्यासोबत बोलत होतं, याची चौकशी झाली पाहिजे, असंही नाना पटोले म्हणाले आहेत. त्यासोबतच डॉ. तावरे याप्रकरणाचे साक्षीदार आहेत, त्यामुळे त्यांना सुरक्षा पुरवली पाहिजे, असंही नाना पटोले म्हणाले आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram