Murlidhar Mohol पुणेकर कर्ज रुपाने मत देतील, मी त्यांच्या अपेक्षा कामातून व्याजासहित पूर्ण करणार
भाजपचे पुणे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ हे आज निवडणूक अर्ज दाखल करणार आहेत. त्याआधी मुरलीधर मोहोळ पुण्याच ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपतीचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर कोथरूड मधील शिविजी महाराजांच्या पुतळ्यापासून रॅलीला सुरुवात होणार आहे. रॅलीच्या समारोपानंतर होणाऱ्या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित राहणार आहेत.