Murlidhar Mohol Pune : योगा दिनाच्या कार्यक्रमात थेट कार्यकर्त्याच्या भूमिकेत केंद्रीय मंत्री

Continues below advertisement

Murlidhar Mohol Pune : योगा दिनाच्या कार्यक्रमात थेट कार्यकर्त्याच्या भूमिकेत केंद्रीय मंत्री 

हेही वाचा :

पुण्याचे नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ (Murlidhar mohol) यांनी आज मुंबईतील शिवतीर्थ बंगल्यावर जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी, लोकसभा निवडणुकीत मनसेनं दिलेल्या पाठिंब्याबद्दल मोहोळ यांनी राज ठाकरेंचे (Raj Thackeray) आभार मानले. राज ठाकरे यांना पुण्याबद्दल विशेष प्रेम आहे, लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान त्यांनी भविष्यातील पुणे (Pune)  कसं असावं यासंदर्भात जाहीर सभेत भाषण करुन काही अपेक्षाही नेतेमंडळींकडून व्यक्त केल्या होत्या. त्यामुळेच, निवडणूक निकालानंतर मुरलीधर मोहोळ यांनी आज राज ठाकरेंची भेट घेऊन पुण्यासंदर्भात चर्चा केली. तसेच, केंद्रीय नागरी हवाई वाहतूक खात्याच्या राज्यमंत्रीपदाची जबाबदारी मोहोळ यांच्याकडे असल्याने त्यांच्या खात्याविषयी चर्चा केली. राज ठाकरेंनी मला मार्गदर्शन केले, असे स्वत: मोहोळ यांनी सांगितले. 

लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीच्या ठराविक उमेदवारांसाठी जाहीर सभा घेतल्या होत्या. त्यामध्ये, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, ठाणे आणि पुणे या ठिकाणी सभा घेत महायुतीच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन केलं होत. पुण्यातील सभेत बोलताना राज ठाकरेंनी पुणे शहराचं वाढतं विस्तारीकरण आणि नागरी समस्यांवर भाष्य करताना पुणे शहराचं व्यवस्थित मॅनेजमेंट आणि सौंदर्यीकरण झालं पाहिजे, अशी भूमिका घेतली. आपल्या भाषणावेळी त्यांनी मुरलीधर मोहोळ यांना जवळ बोलवून त्यांना विजयी करण्याचं आवाहनही पुणेकरांना केलं होतं. त्यानंतर, लोकसभा निवडणुकीत मुरलीधर मोहोळ मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. विशेष म्हणजे पहिल्यांदाच खासदारकीची माळ गळ्यात पडलेल्या मुरलीधर मोहोळ यांना केंद्रातील मोदी 3.0 सरकारमध्ये काम करण्याची संधी मिळाली. मोहोळ यांच्या रुपाने पुणेकरांना केंद्रीय राज्यमंत्रीपद मिळालं आहे. केंद्रीय राज्यमंत्रीपद मिळाल्यानंतर आज मुरलीधर मोहोळ यांनी शिवतीर्थ बंगल्यावर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली. यावेळी, अभिनेता रमेश परदेशी हाही सोबत होता. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram