Mumbai-Pune Railway : मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर लोणावळ्यात दरड कोसळली
मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर लोणावळ्यात मंकी हिल स्टेशनजवळ रात्री ३ वाजता दरड कोसळली. दरड हटवण्याचं काम सुरु आहे. सुदैवानं या दुर्घटनेचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर झालेला नाही. लोणावळ्यातून कर्जतकडे जाणाऱ्या इंजिनवर ही दरड कोसळली. या इंजिनाला बोगी जोडलेल्या नव्हत्या. त्यामुळे कुणाला हानी झाली नाही.
Tags :
Lonavala Mumbai-Pune Railway Line Landslide Mumbai-Pune Railway Mumbai-Pune Landslide Monkey Point