MPSC Students beaten at Onkareshwar Temple: पुण्यातील ओंकारेश्वर मंदिरात MPSC विद्यार्थ्यांना मारहाण
एमपीएससी विद्यार्थी आणि ओंकारेश्वर मंदिर ट्रस्ट मधल्या पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाल्याचा व्हिडीओ समोर, विद्यार्थी मंदिराची वेळ संपल्यावर ही मंदिर परिसरात बसले होते. त्यामुळे ट्रस्टच्या प्रतिनिधींनी हटकल्या ने त्यांच्यात बाचाबाची झाल्याचं प्राथमिक माहिती समोर आलंय. शुक्रवारी दुपारची ही घटना असून, विद्यार्थी आणि ट्रस्टने आपापसात हा वाद मिटवून घेतला आहे.ओंकारेश्वर मंदिरात अनेक विद्यार्थी बसतात अभ्यासाला विद्यार्थी वेळ संपल्यावर ही दुपारी थांबल्याने हा वाद झाला होता. दोन्ही बाजूंनी पोलिस स्टेशन ला घटनेची माहिती दिली मात्र कोणीही तक्रार न देता, प्रकरण आपापसात मिटविण्यात आलेले आहे.