MPSC Protest Pune:पुण्यात MPSCचं आंदोलन सुरूच; कृषी विभागाच्या परिक्षेचं नोटीफिकेशन काढण्याची मागणी
MPSC Protest Pune:पुण्यात MPSCचं आंदोलन सुरूच; कृषी विभागाच्या परिक्षेचं नोटीफिकेशन काढण्याची मागणी
आयबीपीएस परीक्षा आणि एमपीएससीची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी ठेवण्यात आल्याच्या निर्णयाविरोधात पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांकडून आंदोलनाला (MPSC Students Protest Pune) मोठे यश आले आहे. एमपीएससीच्या गुरुवारीच्या बैठकीत 25 ऑगस्टची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज रोजी आयोजित आयोगाच्या बैठकीमध्ये रविवार, दि. 25 ऑगस्ट 2024 रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, विद्यार्थी अद्याप आपल्या मागण्यांवर ठाम आहेत, तर आंदोलनस्थळी (MPSC Students Protest Pune) विद्यार्थ्यांनी दोन दिवसांपासून उपोषण केलं आहे, त्यापैकी एका विद्यार्थ्यांला भोवळ आल्याची माहिती समोर आली आहे.
आंदोलनस्थळी विद्यार्थी आक्रमक झाल्याचं दिसून आलं, त्यावेळी काही उपोषणाला बसलेल्या विद्यार्थ्याला भोवळ आली, त्यामुळे वैद्यकीय मदत बोलावण्यात आली आहे. आंदोलनाच्या ठिकाणी एका विद्यार्थ्याला चक्कर आली आहे. बाकी विद्यार्थ्यांनी त्याला उचलून जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे. एमपीएससीच्या गुरुवारीच्या बैठकीत 25 ऑगस्टची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, विद्यार्थी अद्याप आपल्या मागण्यांनर ठाम आहेत. कृषी विभागाच्या 258 जागांवर परिक्षा घेण्यावर नोटिफिकेशन काढण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. तर हा निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचं विद्यार्थ्यांनी म्हटलं आहे.