MPSC Exams : अभ्यासक्रम 2025 सालापासून लागू करण्याची विद्यार्थ्यांची मागणी : ABP Majha
एमपीएससीची परीक्षा जुन्या अभ्यासक्रमानुसार व्हावी आणि नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू व्हावा या मागणीसाठी आज पुण्यातील अलका चौकात आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. मागच्या महिन्यात एमपीएससीचा अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं, मात्र तसा निर्णय अद्याप झालेला नाहीय, असा आरोप विद्यार्थांनी केलाय. दरम्यान, आचारसंहितेचं कारण देत विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारलीय.