
Jaipur | पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती गौतम पाषाणकर सुखरुप, पुणे पोलिसांनी जयपूर येथून घेतलं ताब्यात
Continues below advertisement
पुणे : गेल्या काही दिवसांपासून गायब असलेले पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती गौतम पाषाणकर यांचा अखेर पोलिसांनी शोध घेतला आहे. गौतम पाषाणकर आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहून 21 ऑक्टोबरपासून बेपत्ता झाले होते. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची पथके त्यांचा तपास करत होती. मात्र मागील महिनाभरापासून त्यांचा तपास लागत नव्हता. परंतु आज दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास पुणे पोलिसांनी गौतम पाषाणकर यांना जयपूर येथून ताब्यात घेतले आहे. जयपूर येथील एका हॉटेलमधून पोलिसांनी त्यांना सुखरूप ताब्यात घेतलं आहे.
Continues below advertisement