st stand | पुण्यातील शिवाजीनगर एसटी बसस्टँड बंद | ABP Majha
पुण्यातील शिवाजीनगर एस टी बस स्टँड कालपासून बंद झाले झाले आहेत. शिवाजीनगर बस स्थानक आहे त्या ठिकाणी मेट्रो आणि एस टी बस स्थानक अशी एकत्र भव्य इमारत बांधण्याचे काम चालू असल्यामुळे हा तात्पुरता बदल करण्यात आलाय. आता हे बसस्थानक खडकी भागातील बजाज उद्यानाजवळ हलवण्यात आले आहेत. आता पुढील 4 ते 5 वर्षे खडकीमध्ये हे बसस्थानक असणार आहे.