Manoj Jarenge : मनोेज जरांगे पुण्यात, शिवनेरी किल्ल्याला अभिवादन करुन दौऱ्याला सुरुवात करणार
पुणे : मराठा आरक्षणासाठी उपोषण करुन (Maratha Reservation) मोठा लढा उभा करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांची आंतरवाली सराटीनंतर (Antarwali Sarati) आज थेट पुणे जिल्ह्यात तोफ धडाडणार आहे. पुणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी आज जरांगे पाटील सभा घेणार आहे. या सभेसाठी लाखो मराठे पुन्हा एकवटल्याचं पाहायला मिळणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी पुणे जिल्ह्यात मराठे एल्गार करणार आहेत. या मॅराथॉनसभेला लाखो मराठे हजेरी लावणार आहेत.