Malavli Railway Station Rush : लोणावळा लगतच्या मळवली रेल्वे स्थानकावर पर्यटकांची तुफान गर्दी

 पुणे-मुंबई लोहमार्गावरील मळवली रेल्वे स्थानकांवर आज पर्यटकांची तुफान गर्दी पाहायला मिळाली. लोणावळ्यात होणारी वाहतूक कोंडीत अधिकचा वेळ खर्चीक होतो, म्हणून पर्यटकांनी मळवली लगतच्या निसर्गाचा आनंद लुटण्याला पसंती दिली. यासाठी पुणे-मुंबईतील पर्यटक थेट रेल्वेने मळवलीला पोहचले. यामुळं त्यांचा पैसे आणि वेळ असा दुहेरी फायदा झाला. मात्र बहुसंख्य पर्यटकांनी हाच विचार केल्यानं परतीच्या वेळी सगळे एकाचवेळी मळवली रेल्वे स्थानकावर पोहचले. अन रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी पाहायला मिळाली. रेल्वे पकडण्यासाठी या पर्यटकांमध्ये चढाओढ ही होत आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola