Kasba Peth Bypoll Election : कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीबाबत अद्याप महाविकास आघाडीचा निर्णय

कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीबाबत अद्याप महाविकास आघाडीचा निर्णय झालेला नाही... मात्र या निवडणुकीबाबत काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डाची आज बैठक पार पडणार आहे... कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसची भूमिका काय असावी? याबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे... या बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पार्लमेंटरी बोर्डाचे सदस्य अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि सुशीलकुमार शिंदे उपस्थित राहण्याची शक्यता आहे... दुपारी २ वाजता दादरमधील टिळक भवनमध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलंय..  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola