Pune Dagdusheth Ganpati : Chandrayaan 3 यशस्वी व्हावं यासाठी बाप्पाला अभिषेक Abp Majha
आज चांद्रयान-३ चंदारावर उतरणार आहे. संपूर्ण भारतीयांसाठी हा अभिमानाचा आणि गौरवाचा क्षण...
भारताची चांद्रयान मोहिम यशस्वी व्हावी यासाठी प्रत्येकजण देवाला साकडं घालतोय. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर ट्रस्टच्या वतीनं आज पहाटे गणपतीला अभिषेक करण्यात आला. यासाठी दूध, दही, विविध फळांचा रस, सुकामेवायांसह आदींचा वापर करण्यात आला. याशिवाय गणपती बाप्पाच्या मुकुटावर चंद्रकोर लावून भालचंद्र शृंगार करत बाप्पाला सजवण्यात आलं.