Lonavala Road Widening : रस्ते रूंदीकरणासाठी बंगल्याच्या सुरक्षा भिंती हटवल्या
Lonavala Road Widening : रस्ते रूंदीकरणासाठी बंगल्याच्या सुरक्षा भिंती हटवल्या पुण्याच्या लोणावळ्यातील बंगल्याच्या सुरक्षाभिंती हटवण्यात आल्यात. रस्ता रुंदीकरण आणि ड्रेनेज लाईन टाकण्याच्या नावाखाली ही कारवाई नगरपरिषदेने केलीये. मात्र ही कारवाई चुकीची असून इतर बंगल्याच्या आणि घराच्या सुरक्षा भिंती का हटवल्या नाहीत? असा सवाल रहिवाशांनी विचारला आहे. तसंच नगरपरिषदेने दिलेल्या दोन नोटिसींना उत्तर देताना आम्हीही वकिलामार्फत एक नोटीस दिलेली आहे. त्याला उत्तर न देता थेट कारवाई केल्याचा आरोप रहिवाशांनी केलाय. तर नियमाला धरुन कारवाई केल्याचं नगरपरिषदेने म्हटलंय, पण कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिलाय.