Lonavala Bhushi Dam Updates : संध्याकाळी 5 नंतर लोणावळ्याच्या भुशी धरणावर बंदी ABP Majha
Continues below advertisement
जुलैच्या सुरुवातीपासून पावसानं चांगलाच जोर धरलाय. याच पावसाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची पावलं धबधबे, धरणांच्या दिशेने वळतात... यांत पर्यटकांचं आवडतं ठिकाण म्हणजे लोणावळ्याचं भुशी डॅम... गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे भुशी धरणाच्या पायऱ्यांवरुन पाणी वाहू लागलंय.. त्यामुळे भुशी धरणावर पर्यटकांची गर्दी वाढतेय.. याच पार्श्वभूमीवर संध्याकाळी पाचनंतर भुशी धरणावर पर्यटकांना बंदी घातलीय. बऱ्याचदा उशिरापर्यंत पर्यटक धरणावर थांबतात. त्यामुळे दुर्घटना टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. शनिवार आणि रविवारीसुद्धा हा नियम लागू राहणार आहे.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra Monsoon IMD Mumbai Rains Weather Updates Lonavala Bhushi Dam Maharashtra Rains Lonavala Tourism Monsoon 2022 Lonavala Rain Lonavala Bhushi Dam Updates