Lockdown | पश्चिम महाराष्ट्रात 27 प्रमुख उद्योग पुन्हा सुरु, कामगारांच्या हाताला रोजगार
पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्रातील या पाच जिल्ह्यांमधील सत्तावीस मोठे उद्योग पुन्हा सुरु करण्यात आले आहेत. लॉकडाऊनच्या काळातील सर्व नियम आणि अटी पाळून काम सुरु करण्यास या उद्योगांना परवानगी देण्यात आली आहे. पुणे विभागाचे उद्योग सहसंचालक सदाशिव सुरवसे यांनी ही माहिती दिली आहे. दरम्यान पुणे, पिंपरी चिंचवड आणि पीएमआरडीए हद्दीतील उद्योग मात्र अजूनही बंदच आहेत.