लॉकडाऊन नंतर पहिल्यांदा धावणार पुणे लोकल! फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवेश | Special Report
पुणे : मध्य रेल्वे आता पुणे लोकल देखील सुरू करणार आहे. आजच पुणे लोकल सुरू करणार असल्याचे मध्य रेल्वेने प्रसिद्धीपत्रक काढून सांगितले आहे. येत्या 12 तारखेपासून पुणे लोकल धावणार आहे. मात्र, ही लोकल केवळ अत्यावश्यक सेवेतील सरकारी कर्मचारी आणि खासगी क्षेत्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी सुरू करण्यात येत असल्याचे मध्य रेल्वेने सांगितले आहे.