वाचन प्रेरणा दिनी ग्रंथालयं खुली, 'एबीपी माझा'च्या मोहिमेला यश, पुण्यातील ग्रंथालयातून आढावा
Continues below advertisement
मुंबई : ग्रंथालयं सुरु करा म्हणून एबीपी माझानं सुरु केलेल्या मोहिमेला यश मिळालं आहे. लॉकडाऊनंतर ग्रंथालयं सुरु करण्यासंदर्भात सरकारनं निर्णय घेतला आहे. वेगवेगळ्या ग्रंथालयांच्या विश्वस्तांनी कृष्णकुंजवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. राज ठाकरे यांनी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याशी बातचित केली होती. यावेळी ग्रंथालयं सुरु करण्यासंदर्भात आठवडाभरात नोटीफिकेशन काढणार असल्याचं उदय सामंत यांनी राज ठाकरे यांना सांगितलं आहे. ग्रंथालयं सुरु करण्यासाठी एबीपी माझानं देखील विशेष मोहिम चालवली होती.
Continues below advertisement