Pimpri Chinchwad : पिंपरी-चिंचवड पोलीसांची फिल्मी स्टाईल कारवाई, निटिझन्सनं उपस्थित केले सवाल

खुनाच्या आरोपातील तीन आरोपींना ते पळून जात असताना आणि पुळून जात असताना ते गोळीबार करत असताना पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी झाड फेकून मारुन पकडल्याचा दावा पिंपरी-चिंचवड पोलीसांनी केलाय.  पिंपरी-चिंचवड पोलीसांनी हा दावा करताना प्रसिद्ध केलेल्या  प्रेस नोट आणि झाडाच्या फोटोची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.  अनेकजण पिंपरी-चिंचवड पोलीसांच्या या फिल्मी स्टाईल कारवाईबाबत तिरकस कॉमेंट्स करतायत. 
काही दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवडमधे योगेश जगताप नावाच्या तरुणाची भर दिवसा रस्त्यात गोळीबार करून हत्या करण्यात आली.  काही दिवसांच्या अंतराने पिंपरी-चिंचवडच्या हद्दीत एकापाठोपाठ तिन हत्या झाल्याने पिंपरी-चिंचवड पोलीस आणि पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश काय करतायत असा प्रश्न विचारला जाऊ लागला होता. अशावेळी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी केलेल्या दबंग स्टिक आरवाईची सध्या सगळीकडे चर्चाय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola