Kishore Aware : किशोर आवारेंच्या खुनाप्रकरणी नवं वळण, माजी नगरसेवकाच्या मुलानं रचला होता कट
Continues below advertisement
पुण्याच्या तळेगावमधील किशोर आवारे हत्या प्रकरणाने आणखी नवं वळण घेतलंय.... तळेगाव नगरपरिषदेचे माजी नगरसेवक भानू खळदे यांचा मुलगा गौरव खळदे याने ही हत्या घडवून आणल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलंय.. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींनी ही माहिती दिल्याचं समोर आलंय... जुन्या वादातून गौरव खळदे यांनी बदला घेण्याच्या हेतूने ही हत्या घडवून आणल्याचं उघड झालंय... काही महिन्यांपूर्वी जुन्या नगरपरिषद परिसरात माजी नगरसेवक भानू खळदे आणि किशोर आवारेंमध्ये वाद झाला होता.. त्यावेळी आवारेंनी खळदे यांच्या कानशिलात लगावली होती.. त्याचाच राग मनात धरून गौरव खळदे याने नगरपरिषद कार्यालयातच आवारेंची हत्या घडवून आणली...
Continues below advertisement